जो जो होय मोठा तो तो चिंता वाढे ।
जो जो होय मोठा तो तो चिंता वाढे ।
दुःखाचे पवाडे अंगी लागे ||धृ ||
आसक्तिचा जोर अहंकार थोर ।
मोठेपणी घोर दुःखे होती ||1||
विषयांचा पाश बळे बांधी गळा ।
जरा ना मोकळा राहे प्राणी ||2||
तुकड्यादास म्हणे रहावे लहान ।
सर्व मान पान सोडोनिया ||3||