जाऊ नका कोणी गङ्या ! पंढरीसी

जाऊ नका कोणी गङ्या ! पंढरीसी । 
देव तो वापसी येऊ न दे ||धृ ||
बहुता लागला झोंबला जन्माचा । 
करू नका त्याचा संग कोणी ||1||
करुनि घ्या यात्रा जीव- भावाचिया । 
मग पंढरी या  जावे कोणी ||2||
तुकडयादास म्हणे देव कर्नाटकी । 
जीवभाव शेखी उरो नेदी ||3||