श्रीमंतीच्या जोरे चढ़े अहंकार । पापाचे डोंगर करे घरी
श्रीमंतीच्या जोरे चढ़े अहंकार ।
पापाचे डोंगर करे घरी ||धृ ||
कोणी ना बोलती मुके होती द्रव्ये।
मोठे लहान सर्व भाऊबंद ||1||
पाळी भरलिया फुटे पाप-ढोले ।
हांसतील भले लोक सर्व ||2||
तुकड्यादास म्हणे शाहूचा तमाशा ।
मारताति वेश्या पैजारेने ||3||