घने सुख घेती काय मिळे अंती ?

घने सुख घेती काय मिळे अंती ? । 
बांधतील छाती काय धन ? ||धृ ||
कोणी आजवरी नेलेसे बांधोनी । 
साक्ष तरी कोणी देईना ही ||1||
आला तसा गेला जगाचा व्यवहार । 
पुत्र नारी नर सोडूनिया ||2||
तुकड्यादास म्हणे धन हरिनाम । 
जन्मोजन्मी काम देई जिवा ||3||