अठराही पुराणे श्रुतिशास्त्र-मत ।

अठराही पुराणे श्रुतिशास्त्र-मत । 
जाहले संमत नामासाठी ||धृ ||
गोड नाम जपा अंतरी धरोनि । 
चुकेल धरणी काळाची त्या ||1||
नाही आडकाठी जाया मोक्षपुरी । 
सायुज्यता घरी बसता येई ||2||
तुकड्यादास म्हणे नाम जपा कारे  । 
निर्मळ अंतरे करूनिया ||3||