रोज नित्यक्रमें अस्तीं अरुणोदयी
रोज नित्यक्रमें अस्तीं अरुणोदयी ।
प्रभुनाम घेई शुध्द-भावे ||धृ ||
तयासी न भासे दुःख संसाराचे ।
धैर्य हे मनाचे वाढो लागे ||1||
प्रेम-ज्योति जळे जयाचे अंतरी ।
तयासी श्रीहरी दुःख नेदी ||2||
तुकड्यादास म्हणे त्याचे काम करी ।
संकटे निवारी पांडूरंग ||3||