हरीचे गाता गाणे

हरिचे गाता गाणे ।
जया जगा लागे भिणे ||धृ ||
जळो त्याचा थोरपणा । 
जरी पंडीत शहाणा ||1||
सर्व सोडोनिया लाज । 
भजा भजा पंढरिराज ||2||
तुकड्यादास नित्य म्हणे । 
नामावीण व्यर्थ जिणे ||3||