जळो जळो त्याची थोरी । ज्याच्या नाम ना वैखरी

जळो जळो त्याची थोरी । 
ज्याच्या नाम ना वैखरी ||धृ ||
नको नको त्याचा संग । 
जया न रुचे पांडुरंग ||1||
तोचि असे एक भला । 
राम स्मरणे जो रंगला ||2||
तुकड्या  म्हणे मोठा लाभ । 
एक नामचि दुर्लभ ||3||