ढगांच्या काळोखी अंधारिया निशी

ढगांच्या काळोखी अंधारिया निशी 
फ़ाटका लाविशी ! सख्या कैसा ? ||धृ ||
झडी पाणियाची वर्षते सारखी ।
होताती पारखी सरी सर्व ||1||
ऐसिया प्रसंगी कोण आम्हा दुजा। 
सख्या केशवराजा! तुझ्यावीण ? ||2||
तुकङ्यादास म्हणे उघडा झोपाड़ा ।
अव्हेर येवहा करू नका ||3||