करिती ते नाही तुज मान्य झाले

करिती ते नाही तुज मान्य झाले । 
न करिता आले द्वारी तुझ्या ||धृ ||
ऐसा आम्हा आला रोकडा अनुभव । 
सांगतो गौरव देवा ! तुझा ||1||
पापी अजामिळ मोक्षपदा नेला ।
नहूष घातला सर्प-योनी ||2||
तुकड्यादास म्हणे माझा हा आक्षेप । 
सोडती निष्पाप भक्तजन ||3||