किति युगे झाली तू नाही भेटला

 किति युगे झाली तू नाही भेटला । 
कैसा आम्हा गेला विसरोनी ? ||धृ ||
दया माया तुज जरा का येईना? । 
आमुच्या अनुमाना आले नाही ||1||
चालता वाटेने वाटसरु दिसे ।
प्रेम त्यांचे बैसे दोघांमाजी ||2||
तुकड्यादास म्हणे देवा तू कृपाळू । 
काय ऐसा काळू होसी दीना ? ||3||