सदा नारायण पुजावा सुमरने

सदा नारायण पुजावा सुमरने ।
काया वाचा मने करोनिया  ||धृ ||
दिव्य तेज त्याचे लाथेल अंतरी । 
आपणा ऐसे करी क्षणीं एका ||1||
पारखे व्हा तम अज्ञान अँधारा । 
ज्ञानाचिया द्वारा हात मारा ||2||
तुकड्यादास म्हणे रहा ब्रह्मगिरी । 
निरंजनावरी निर्मोहाच्या ||3||