आपुलिया दासा होऊ न दे भार । सोसीतसे वार देव अंगी |

आपुलिया दासा होऊ न दे भार । 
सोसीतसे वार देव अंगी ||धृ ||
प्रल्हादाकारणे नरसिंह झाला । 
धृव सांभाळिला घोरवनी ||1||
पांडवा कारणे धरिला वनवास । 
सर्व त्यांचा त्रास सहन केला ||2||
तुकङ्यादास म्हणे द्रौपदिच्या काजा । 
सखा यदुराजा घाव घाली ||3||