सदा गर्जती पुराणे । तया भक्तांच्या कारणे

सदा गर्जती पुराणे । 
तया भक्तांच्या कारणे ||धृ ||
देव गाताती महिमा  । 
भक्तां भाविकांची सीमा ||1||
दळण कांडण पुराणी । 
तया भक्तांची निशाणी ||2||
तुकड्या म्हणे उद्धरले । 
ज्यांनी प्रभु-प्रेम केले ||3||