कठीण स्त्री-जातीचा संग

कठीण स्त्री-जातीचा संग । 
करी आयुष्याचा भंग  ||धृ ||
थोर जपी तपी सर्व । 
तेणे उतरविला गर्व ||1||
देवादिकां ते मोहवी । 
ऐसी स्त्री-कामाची चवी ||2||
तुकड्या म्हणे सावधान। 
विषयी वाचवावे मन ||3||