आवड़ेना ज्यासी हरि-गुणकथा

आवड़ेना ज्यासी हरि-गुणकथा।
नम्र नोहे माथा ऐशा पायी ||धृ ||
तयाच्या संगती वळे ना है मन । 
केलिया जतन संग त्याचा ||1||
गुण दोष त्याचे बाणतील अंगी । 
ऐसियाच्या रंगी रंगो नये ||2||
तुकड्यादास म्हणे मुकला तो नर । 
जयासी ईश्वर-भक्ति नाही ||3||