स्त्रि -भोगा अधिक स्त्रैण पापी राहे

स्त्री-भोगा अधिक स्त्रैण पापी राहे । 
तया संगे पाहे नर्कवाट ||धृ ||
खाता पिता तथा चैन ना जरासी । 
ठेवी विषयासी ध्यानी मनी ||1||
जरि तैसी भक्ति केली या विठ्ठलि  । 
इंद्रपद- डोली याचियाने ||2||
तुकड्यादास म्हणे रहा सावधान । 
स्त्रैणांचे पासून टूर रहा ||3||