काय रे वाचता पुराण कागदे
कायरे बाचता पुराण कागदे
काय याने कांदे हाती येती ? ||धृ ||
मुखातुनि रत्न गाळले बाहेरी ।
सांगतांना थोरी, थोरी नोहे ||1||
करावे ते आधी तेव्हां पावे सुख ।
नाहीतरी दुःख तोंडाळासी ||2||
तुकड्यादास म्हणे आचरावे तैसे ।
तेव्हां सुख दिसे जिवालागी ||3||