उठा उठा रे सकळ

 उठा उठारे सकळ । 
आला उन्नतिचा काळ ||धृ ||
उभे झाले नेते वक्ते । 
संत महंतादि भक्त ||1||
न्यायतत्वाचा विचार । 
आला नेत्राच्या समोर ||2||
तुकड्यादास म्हणे चला । 
मार्ग गाठावा आपुला ||3||