झगडू नका पोटासाठी

झगडू नका पोटासाठी । 
झगडा समाजाच्या अटी ॥
आम्ही करू उपवास । 
परी जना न हो त्रास ।।
आम्ही भिकारीच राहू । 
परी जना सुखी पाहू ॥
तुकड्या म्हणे आम्ही मरू। 
जगा स्वतंत्रचि करू" ॥