आवडीने गासी आवडसी देवा ।

आवडीने गासी आवडसी देवा ।
विसरसी भावा संदेहाच्या ॥धृ ॥
संदेह गेलिया दृढ़ होय मती । 
संचरे श्रीपती अंतर्बाह्य ॥1॥
देव संचरला दुजेपणा गेला । 
होउनिया ठेला एकरूप ॥2॥
तुकड्यादास म्हणे आवडी घे मनी । 
श्रवणी कीर्तनी संतसंगे ॥3॥