सुख डोळियांचे पहावे श्रीमुख ।
सुख डोळियांचे पहावे श्रीमुख ।
करावे कौतुक गौरवाने ॥धृ ।।
सावळा मुरारी गरुड़ी बैसला ।
आकाशी झळकला सूर्य जैसा ।।1।।
केशरी तिलक पिवळा पीतांबर ।
वैजयंति सुंदर गळा शोभे ।।2।।
तुकड्यादास म्हणे दिसला सामोरी ।
ऐसे ध्यान धरी ध्यानी ध्याता ।।3।।