चित्ता गौरवोनी गहिवरावे त्यागे ।

चित्ता गौरवोनी गहिवरावे त्यागे । 
तरिच भक्ति लागे अंतरंगी ॥धृ॥
आठवावे गुण दोष आपुलिये । 
पायी देवाचिये अर्पावया ॥1॥
मागोनिया क्षमा सावधान व्हावे । 
पुन्हा न करावे कधी काळी ॥2॥
तुकड्यादास म्हणे याचि मार्गे संत । 
जावोनी अनंत प्राप्त केला ॥3॥