रडू येता माता धावें घेई बाळा ।
रडू येता माता धावें घेई बाळा ।
सोडोनी सगळा कामधंदा ॥धृ ॥
तैसे प्रभूःध्यानी रडावे चिंतने ।
हृदय प्रेमाने ओथम्बोनी ॥1॥
सुखदुःख सर्व सांगावे आपुले ।
काय पाप केले जन्मी आम्ही ॥2॥
तुकड्यादास म्हणे पश्चाताप होता ।
पाप हे सर्वथा जळे साचे ॥3॥