आपुल्या कर्माचे घ्यावे प्रायचित्त
आपुल्या कर्माचे घ्यावे प्रायचित्त ।
मग यम-लोकात दुःख नोहे ।।धृ ।।
करू नये तैसे पुन्हा पाप दोष ।
क्षमा जगदीश देई भक्ता ।।1।।
घडीघडी क्षमा घड़ीघडी पाप ।
ऐसे होता ताप वाढे दुणा ।।2।।
तुकड्यादास म्हणे संकट नसावे ।
निर्मळ रहाये नाम घेता ।।3।।