गेले त्यासी सोडा सावध व्हा पुढ़े

गेले त्यासी सोडा सावध व्हा पुढ़े । 
काय ते रोकड़े करा आता ॥धृ ॥
निश्चये गा हरी सोडुनी कुसंगा । 
संतसंगी रंगा भक्ति भावे ॥1॥
पापी अजामीळ शेवटी स्मरला । 
तरी उद्धरला नाम धेता ॥2॥
तुकड्यादास म्हणे संकट नसावे | 
निर्मळ राहावे नाम घेता ॥3॥