साधावे स्वहीत आपुलाले आता

साधावे स्वहीत आपुलाले आता । 
वरी लक्ष देता बुडो लागे ॥धृ ॥
म्हणो नये कोणा उत्तम वाईट । 
निंदा करी स्पष्ट देवाची ते ॥1॥
गुण गाई त्याचे शिव्या देत नाचे । 
आणीक जगाचे काम नाही ॥2॥
ऐसी ज्याने स्थिती ठेविली अंतरी । 
पावे त्या श्रीहरी तुकड्या म्हणे ॥3॥