ताक दूध दोन्ही एकरंगी राहे ।
ताक दूध दोन्ही एकरंगी राहे ।
खाणाराचि पाहे चवी त्याची ॥धृ ॥
बहुरूपी भकति करितो नेटोनी ।
भक्ति त्याची मनी तोचि जाणे ॥1॥
संत जाणताती भक्तिचिया कळा ।
हा रंग खेगळा रुचा घेता ॥2॥
तुकडयादास म्हणे निंदक दुर्जन ।
माणसांचे वाण परि ते न्यारे ॥3॥