चौर्यांशी आसने साथतील पोटे
चौर्यांशी आसने साथतील पोटे ।
काय त्यांसी भेटे देवराव ? ॥धृ ॥
बाह्य जगासाठी नटती कीर्तनी ।
प्रेम नाही मनी तरि ते व्यर्थ ॥1॥
दंभे मानासाठी सांगतील ज्ञान ।
तया नारायण कळे केवी ? ॥2॥
तुकड्या म्हणे जंवं नाही निष्काम ।
तंवं तो आत्माराम सुखा नेदी ॥3॥