लागलीसे चिंता निर्वाहाची माथा ।
लागलीसे चिंता निर्वाहाची माथा ।
काय तो परमार्था सेवू लागे ? ॥धृ ॥
मिष्टान्नासी करी हाव हाव मंनी ।
तयासी कीर्तनी शांति कैसी ? ॥1॥
जयाची इंद्रिये पळे सैरावैरा ।
तया भक्ति-झरा कैसा लाभे ? ॥2॥
तुकडयादास म्हणे त्याग नाही जया ।
परमार्थाचा पाया नवचे त्या ॥3॥