गोपिचंदनाचे लावोनिया टिळे ।

गोपिचंदनाचे लावोनिया टिळे । 
वाजवितो टाळ सायंकाळी ॥धृ ॥
तुळसींची माळ खांदिया पताक । 
नाचे शुकथुक मार्गामाजी ॥1॥
परि नाही गेली विषय-वासना । 
पाहे आड कोणा दुष्टी नारी ॥2॥
तुकड्यादास म्हणे लुबाडे रुक्यासी । 
करावया खुशी साहुकारी ॥3॥