गळा तुळसीची माळ

गळा तुळसीची माळ । 
परी चालणे ओढाळ ॥धृ ॥
पाय सावरीना कधी । 
धाव घेती ते दुर्गंधी ॥1॥
काय करी भागवत ? । 
नाही निर्मळ नियत ॥2॥
तुकड्यादास म्हणे । 
चिन्ह दिसे आचरणे ॥3॥