चित नाही स्थीर

चित नाही स्थीर । 
काय करील मंदीर ? ॥धृ ॥
अंगी नाही सदाचार । 
काय भूषणांचा भार ? ॥1॥
नम्र नाही संती । 
काय सांगे त्याची मरती ? ॥2॥
तुकड्या म्हणे भाव नाही।
काय करील विठाई  ? ॥3॥