अंगी नाही भक्ति-झरा ।

अंगी नाही भक्ति-झरा । 
देव कां करी बिचारा ? ॥
आपुलिया कर्मे घेणे । हे तो देवाजीचे देणे ॥
केले नाही कांही । मुक्ति मागणे फोल ही ॥
तुकड्या म्हणे करा । पुढे मागा हरिहरा ॥