साधिलिया साध्य नोहे भक्तिरस
साधिलिया साध्य नोहे भक्तिरस ।
पाहिजे चुरस अंतरंगी ॥धृ ॥
बनावटी लपू न शके कल्पांती
कळो येई अंती सोंग-साचे ॥1॥
कागदाची फुलें रंगाने रंगली ।
सुगंधीसि आली, कैसे म्हणो ? ॥2॥
तुकड्यादास म्हणे व्हावा कळवळा ।
तरीच सांवळा साध्य होई ॥3॥