दावी बाह्य भाव । कैसा पावे देवराव

दावी बाह्य भाव । कैसा पावे देवराव ? ॥
काय देवासी ना कळे । अंतरंगाचे डोहाळे ॥
कामी भक्ति करी । हे तो तेवढ्याचि परी ॥
तुकड्यादास म्हणे । देव पाहे सत्य जिणे ॥