दारिद्रयाची भक्ति भेटो द्रव्य कांही

दारिद्रयाची  भक्ति भेटो द्रव्य कांही ।
सकामीच राही दंभ त्याचे ॥धृ ॥
रोगियाची भक्ति रोग जाया साठी ।
पाडितसे कष्टी देवालागी ॥1॥
वांझेची ती भक्ति पुत्र व्हावा मज । 
व्रत नेम साज त्याचसाठी ॥2॥
तुकडयादास म्हणे भक्त करी भक्ति । 
पावया विरक्ति इहलोकाची ॥3॥