दारिद्याची भक्ति राहे पोटासाठी

दारिद्याची भक्ति राहे पोटासाठी । 
देव होय कष्टी त्याच प्रेमे ॥धृ ॥
जैसा जो भजेल तैसा त्या पावेल  । 
गीतेमाजी बोल बोले कृष्ण ॥1॥
निष्कामे भजती प्रेमळ जे भक्त ।
तया देव होत आपुलासा ॥2॥
तुकड्यादास म्हणे देव प्रसन्नला । 
दारिद्रि विकला पोटासाठी ॥3॥