सखा मायबाप मित्र जीवलग ।
सखा मायबाप मित्र जीवलग ।
तूचि तू सर्वाग देवा ! माझा ॥धृ ॥
तुझ्याविणे कोणी नावडेसे झाले ।
हे तो जाणितले आत्मारामे ॥1॥
साक्ष तू अससी अंतरीच्या देवा ! ।
काय मी लपावा ऐसे होते ? ॥2॥
तुकड्यादास म्हणे वाटे चित्ता ऐसे ।
तेव्हां देव दिसे जनी वनी ॥3॥