काम धाम काहीं सुचेना या देहा
काम धाम काहीं सुचेना या देहा ।
भक्तिच्या प्रवाहा लोट आला ॥धृ ॥
चालता बोलता ध्यानी कृष्णनाथ ।
जागृति स्वप्नांत तोचि भासे ॥1॥
जनी वनी सर्व तोचि आठवतो ।
क्षणही न जातो तयाविण ॥2॥
तुकड्यादास म्हणे ऐसे ज्यास वाटे।
येवोनिया भेटे कृष्ण माझा ॥3॥