सोपी नाही भक्ति कळेल जातांना

सोपी नाही भक्ति कळेल जातांना । 
भोगाव्या यातना लागे जन्मी ।।धृ ।।
घड़ोघड़ी होय जनी अपमान | 
द्रव्यही पळोन जाय सर्व ।।1।।
सुख नाही देही आलिया जन्मासी । 
रोग राई खासी ठाण मांडी ।।2।।
तुकड्यादास म्हणे टिकावे यातूनी । 
तरि भक्ति मंनी पूर्ण पावे ।।3।।