तारी देव परी पाहतो कसून

तारी देव परी पाहतो कसून । 
दुःखे दुखवून हाती घेई ॥धृ ॥
धनहीन करी प्रथम भक्तासी
सुख शरीरासी नेदी त्याच्या ॥1॥
आपत्तिच्या लाटा वाढवितो भारी । 
संकष्टा माझारी प्राण घाली ॥2॥
तुकड्यादास म्हणे तावूनी तापोनी । 
देव घेई मनी भक्ता तेव्हां ॥3॥