अपवित्र वाणी नये मुखातुनी
अपवित्र वाणी नये मुखातुनी ।
गोडवे गाऊनी रंगे नामी ॥धृ ॥
लाज विसरोनी नाचे देवापुढे ।
अहंकार-कोड़े सांडुनिया ॥1॥
संत महंतांच्या लोळे धुळीमाजी ।
धनीकाची हाजी चित्ती नेणे ॥2॥
तुकङ्यादास म्हणे धन्य तोचि भक्त ।
राहतो विरक्त जगपाशा ॥3॥