वैष्णव तो एक पीड़ा नेदी कोणा

वैष्णव तो एक पीड़ा नेदी कोणा । 
उपकाराविना श्वास नेघे ॥धृ॥
सर्व हरिदास जे दिसे डोळ्यास । 
तोडी आशा-पाश अहंकार ॥1॥
तनु मने धने सदा करी सेवा । 
अंतरी या देवा दूढावोनी ॥2॥
तुकङ्यादास म्हणे असोनी संसारी । 
जीव भाव दुरी करुनी राहे ॥3॥