लोक परलोक भक्तासी सारखा
लोक परलोक भक्तासी सारखा ।
त्रैलोकीं पारखा नाही भक्त ॥धृ ॥
दुर्जनांच्या सवे तया नाही द्वेष ।
सज्जनी हरूष नाही तया ॥1॥
उष्णे नाही ताप आपे नाही शांती ।
सदा समवृत्ति भक्ताचिये ॥2॥
तुकङ्यादास म्हणे सदा एकरस ।
आनंदी समरस भक्तसखा ॥3॥