तोचि भक्त खरा नाही ज्या वासना
तोचि भक्त खरा नाही ज्या वासना ।
इंद्रिय-भावना दूर झाल्या ॥धृ॥
सर्वाठायी पाहे एक नारायण ।
उंचनीच कोण दृष्टी नये ॥1॥
रंगला रंगणीं रूपी आत्मयाच्या ।
निंदा स्तुति ज्याच्या कानी नये ॥2॥
तुकड्यादास म्हणे झाला देवरूप ।
पाहे निजरूप अंतर्यामी ॥3॥