वाचे उच्चारावा हरी । लक्ष द्यावे पायावरी

वाचे उच्चारावा हरी । 
लक्ष द्यावे पायावरी ॥धृ॥
हाती काम सेवा घ्यावी । 
मनीं भावना ठेवावी ॥1॥
होऊ नये अविश्वास । 
प्राण गेलिया हताश ॥2॥
तुकड्या म्हणे घाली उड़ी। 
तोचि शिपायाचा गडी ॥3॥