तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जया भक्तिचाचि हर्ष । तया कैचा गर्भवास ?
जया भक्तिचाचि हर्ष ।
तया कैचा गर्भवास ? ॥धृ॥
मुक्त झाले तिन्ही लोकी ।
कळिकाळ पडे धाकी ॥1॥
जया मुखात चिंतन ।
काज करी रात्रंदिन ॥2॥
तुकड्यादास म्हणे भव ।
तरे साच तो मानव ॥3॥