लावी आंधळ्यासी वाटे । साफ करी मार्गी काटे

लावी आंधळ्यासी वाटे । 
साफ करी मार्गी काटे ॥धृ॥
हस्ते परहस्ते करी । 
लोकां सांगोनिया घरी ॥1॥
दुर्गंधी करूं न दे मार्गे । 
स्वच्छ आचरणी वागे ॥2॥
तुकड्या म्हणे उपकार । 
अंतर्बाह्य सदाचार ॥3॥