कधी जाऊ नये क्षण । उपकाराचिया वीण

कधी जाऊ नये क्षण । 
उपकाराचिया वीण ॥धृ॥
सदा चालता बोलता । 
कानीं ऐकता झोपता ॥1॥
सदा असावे सावध । 
लोकां द्यावयासी बोध ॥2॥
तुकड्या म्हणे उपकार। 
पुण्यामाजी पुण्य थोर ॥3॥